Chinchwad : ऑनलाइन नोकरीचे आमिष दाखवून महिलेची 13 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाईन नोकरीचे (Chinchwad) आमिष दाखवून 34 वर्ष महिलेला 13 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा फसवणुकीचा प्रकार 21 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत चिंचवड येथे घडला आहे.

पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून विविध बँक खातेधारक व मोबाईल क्रमांक धारक अशा पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : दुचाकी व कंटेनरच्या अपघातात एक जण जखमी तर एकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची प्राथमिक माहिती गोळा करून त्यांना आरोपीने फोन करत नोकरीचे आमिष दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून आरोपीने सुरुवातीला त्यांचे एक पार्सल कस्टमर मध्ये अडकल्याचेही (Chinchwad ) सांगितले.

या दोन्ही गोष्टीसाठी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी विविध मार्गाने 13 लाख 27 हजार रुपये लुबाडले. यावेळी त्याने तो कार्निवल ब्रिझ शिपिंग हे कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवले होते. मात्र आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच फिर्यादीने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून चिंचवड पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.