Chinchwad : एका शोरूममधून दुसऱ्या शोरूममध्ये पोहोचवण्यासाठी दिलेली रिक्षा घेऊन कामगार पसार

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील शोरूममधून संगमवाडी (Chinchwad) येथील शोरूममध्ये पोहोच करण्यासाठी दिलेली रिक्षा घेऊन कामगार पसार झाला. त्याने रिक्षा परस्पर मूळ गावी नेली. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी दीड ते गुरुवारी (दि. 16) सकाळी साडे अकरा वाजताच्या कालावधीत चिंचवड येथे घडली.

संजय रामचंद्र शिंदे (वय 55, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्ता परबतराव गडदे (वय 21, रा. विद्यानगर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शिंदे यांचे थरमॅक्स चौक चिंचवड येथे श्री सेवा सर्विसेस नावाचे शोरूम आहे. त्या (Chinchwad) शोरूममध्ये दत्ता गडदे हा काम करतो.

PMPML : पीएमपीएमएल बस प्रवासात महिलेची सोन्याची बांगडी पळवली

शिंदे यांनी दत्ता याला चिंचवड येथील शोरूम मधून त्यांच्या संगमवाडी येथील शोरूम मध्ये पोहोच करण्यासाठी दोन लाख 22 हजार 41 रुपये किमतीची रिक्षा दिली. ती रिक्षा संगमवाडी येथील शोरूममध्ये न पोहोचवता दत्ता याने मूळ गाव निलंगा लातूर गाठले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.