Pimpri : मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे पालखीमार्गाची स्वच्छता

एमपीसी न्यूज – जमले न चालण्या पायी वारी.. पूण्य_तरीही_मिळवा_पदरी… या उक्तीप्रमाणेच दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे पालखी मार्गावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. कासारवाडी ते फुगेवाडीपर्यंतचा पालखी मार्ग चकाचक करण्यात आला. या अभियानात सुमारे 40 जण सहभागी झाले होते. 

प्रतिष्ठानचे अतुल दौंडकर, चेतन मेस्ता, अनिकेत कडदेकर, विवेक कन्नलू, जयदीप साने, अजय शिंदे, महेश कारळे, अमित दौंडकर, मीरा कुलकर्णी, शीतल गुप्ता, सुनील सालपेकर, रामेश्वरी साखळकर, रीना शिंदे स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. 

गेल्या काही वर्षांपासून संत तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांसमवेत वारकऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. पण पालखी गेल्यानंतर पालखी मार्गावर आणि गावात अस्वच्छता होत होती. त्याच्या स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासन त्यांच्या परीने काम करते.परंतु   त्यांचे प्रयत्न सुद्धा अपुरेच पडतात. याचाच एक भाग म्हणून स्थानिक प्रशासनला मदत म्हणून गेल्या पाच वर्षांपासून  मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. 

यावेळी प्रतिष्ठानमधील पाच वर्षांपासूनच्या मुलापासून सर्व जण या अभियानात सहभागी झाले  होते. पालखी मार्गावरील केळीची सालठे, चहाचे कप हा कचरा उचलून मार्ग चकाचक करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.