Pune cold weather : राज्यात गारठा वाढला, पुण्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

एमपीसी न्यूज : दिवाळीनंतर राज्यात गारवा चांगलाच जाणवत असून हुडहुडी वाढली आहे. तर दुपारी गरमी अशी काहीशी स्थिती आहे.राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे. पुण्यात 12.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. (Pune cold weather) आज मंगळवारी राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यापुढील दिवसांत राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यात गारठा वाढू लागला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान 18 अंशांखाली आल्याने पहाटे गारठा वाढू लागला आहे.(Pune cold weather) कमाल तापमानात चढ-उतार सुरू असून, दुपारी उन्हाचा चटका कायम आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे.यापुढे राज्यात हवामान आणखी थंड राहील असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

Hemant Patil : मल्लिकार्जुन खरगे यांची वागणूक पक्षहितकारक असावी-हेमंत पाटील

उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढत आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या थंडी वाढल्याचे चित्र आहे. सर्वात कमी किमान तापमानाशी नोंद पुण्यात करण्यात आली आहे.(Pune cold weather) पुण्यात 12.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. आहे. IMD च्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात पुणे आणि लगतच्या भागात अशीच थंडी कायम राहणार आहे. गेल्या पाच दिवसांपासून पुण्यात तापमानात मोठी घट झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी पडत असलेल्या थंडीपाऊन बचाव करण्यासाठी लोक शेकोट्या पेटवू लागले आहे.

पुण्यात 24 तारखेला 14.4 अंश सेल्सिअस, 25 ला 13.8 अंश सेल्सिअस, तर 26 आणि 27 तारखेला 14.3, 28 ला 13.8 अंश सेल्सिअस, 29 ऑक्टोबरला 13.3 अंश सेल्सिअ तर सोमवारी 1 तारखेला तब्बल 12.6 अंश सेल्सिअसपर्यंत हे तापमान खाली आहे.

सरासरीच्या तुलनेमध्ये तापमानात घट झाल्याने थंडी वाढली असून हवामान विभागांना दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमधून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे आणि हिमालयीन पर्वतरांगांवर होत असलेल्या बर्फदृष्टीमुळे राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.

कोठे कसे तापमान?

पुणे – 12.6
लोहगाव – 14.7
जळगाव – 14
कोल्हापूर – 17.7
महाबळेश्वर – 13.8
नाशिक – 13.3
सांगली – 17.2
सातारा – 14.3
सोलापूर – 16.1
मुंबई – 24
सांताक्रूझ – 20.5
रत्नागिरी – 22.2
पणजी – 22.8
डहाणू – 20.3
उस्मानाबाद – 15.2
औरंगाबाद – 13
परभणी – 15.4
नांदेड – 16.4
अकोला – 17.8
गोंदिया – 17
नागपूर 16.8

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.