Khadaki News : खडकीमध्ये संजय गांधी मार्केट मंडळाच्या गणपतीसमोर शंखनाद

एमपीसी न्यूज – खडकीमध्ये सर्व प्रथम संजय गांधी मार्केट मंडळाच्या गणपतीसमोर शंखनाद गुरुवारी करण्यात आला.

संजय गांधी मार्केट मंडळाचे नितीन शिंदे म्हणाले की, आतापर्यंत खडकी शहरात कोणत्याही गणेश मंडळाच्या गणपती पुढे शंखनाद करण्यात आला नव्हता. गुरुवारी (दि.8) संध्याकाळी खडकी शहरात सर्वप्रथम संजय गांधी मार्केट मंडळाच्या गणपतीसमोर शंखनाद करण्यात आला. केशव शंखनाद  पथकाच्या 25 जणांनी हा शंखनाद केले.

कार्यक्रमाचे नियोजन नितीन शिंदे व अक्षय शिंदे यांनी केले. नितीन शिंदे म्हणाले की मंडळाचे आधारस्तंभ रवी कुल आहेत. मंडळाचे अध्यक्ष शिवा पाटील आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.