Bhosri : संस्थेला विकलेली जमीन पुन्हा खोटा दस्त बनवत विकल्या प्रकरणी 13 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – संस्थेला विकलेली जमीन पुन्हा खोटा दस्त करून परस्पर दुसऱ्याला विकल्याचा प्रकार भोसरी (Bhosri) प्राधिकरण येथे घडला आहे. ही फसवणूक 10 जून 1997 ते 8 सप्टेंबर 2022 या कालावधीत घडली असून 13 जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रफुल्ल रामचंद्र रंधवे (वय 58 रा. जुनी सांगवी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून महादेव नामदेव लांडगे (वय 69, भोसरी), चैतन्य महादेव लांडगे (वय 40), ऋषिकेश महादेव लांडगे (वय 24), राजू शांताराम भोसले (वय 36), बबन नामदेव लांडगे (वय 89), ओंकार वसंत लांडगे (वय 24) व खरीददार युनूस नुरमोहम्मद शेख यांच्यासह महिलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News : गाडीत बसलेल्या दोन महिलांचे सोने खिडकीतून हिसकावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी 10 जून 1997 साली संस्थेला (Bhosri) समाज कल्याण म.रा. विभागाकडून मिळालेल्या अनुदानीत रकमेतून जमीन मुळ मालकाला देऊन खरेदी केली. मात्र, जमिनीचे खरेदीखत न करता आरोपींनी टाळाटाळ केली. दरम्यानच्या काळात आरोपींनी खोटे दस्त बनवून दुसऱ्याला जागा विकून त्यावर जेसीबीद्वारे सपाटीकरण व खोदकाम करत जागेवर बोर्ड लावला व जागा विकसीत केली जात आहे. मात्र, आज अखेरपर्यंत संस्थेला खरेदीखत न देत फसवणूक केली आहे. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.