Crime News : गाडीत बसलेल्या दोन महिलांचे सोने खिडकीतून हिसकावले

एमपीसी न्यूज – गाडीत बसलेल्या दोन महिलांचे दरवाच्या खिडकीतून हात घालून गळ्यातील सोन्याचे गंटण हिसकावले आहे.ही घटना मोशी येथे देहु आळंदी रोडवर गुरुवारी (दि.8) सायंकाळी पाच वाजता घडली.

महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी महिला व त्यांची बहीण या दोघी त्यांच्या क्रुझर या गाडीत बसल्या होत्या.यावेळी आरोपी तेथे आले व त्यातील एकाने गाडीच्या खिडकीतून हात घालून दोघींच्या गळ्यातील दोन लाख 90 हजार रुपायांचे गंठण हिसकावून घेतले.चोरटा लगेच साथीदाराबरोबर दुचाकीवरून फरार झाला.एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.