Congress : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनमध्ये तरुणांचा जल्लोष

एमपीसी न्यूज – देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू (Congress) लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये तरुणांनी आज जल्लोष केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोरच उत्साही तरूणांनी ठेका धरला. हालगीच्या तालावर नृत्य करीत, शिट्या फुंकत जल्लोष केला.

पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आपला उमेदवार देणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या दाव्यातील हवाच काढून घेतली आहे. पुणे हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे हा मतदारसंघ घटक पाक्षांना देऊ नये, असे साकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याकडे घातल्याचे समजते. काँग्रेसच्या बैठकीत अनेक नेते मंडळींनी सहभाग घेतला.

या निवडणुकीसाठी आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्या नावाची चर्चा आहे. त्यावर बैठकीत मंथन होणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पुण्यात पार पडली.

भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेली पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस पक्षातून तीन मुख्य तीन नेत्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात उमेदवारीवरून मोठी चुरस निर्माण झाली आहे. यावर आता पक्षश्रेष्ठी कसा तोडगा काढणार, हे पाहावे लागेल.

Pune : प्रशासकीय व्यवस्थेची पोलादी चौकट गंजलेली – पृथ्वीराज चव्हाण

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर विजयी झाले. त्यामुळे ते आता पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे इच्छुक आहेत. पक्षाने आपल्याला आदेश दिल्यावर आपण निवडणूक (Congress) लढविणार असल्याचे धंगेकर यांनी निक्षून सांगितले. माजी आमदार मोहन जोशी यांनीही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांचे दिल्ली दरबारी चांगले वजन आहे. अरविंद शिंदे यांनीही शहराध्यक्ष झाल्यापासून विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. गोपाळ तिवारी यांनीही आपण पुणे लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. तर, दुसरीकडे ऍड. अभय छाजेड यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.