Entertainment News : ओटीटी माध्यमांवरील कंटेटला लवकरच लागू शकते कात्री

एमपीसी न्यूज: ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होणा-या कंटेटला लवकरच सेन्सॉरची कात्री लागू शकते, असे संकेत केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाशक जावडेकर यांनी दिले आहेत. ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होणारे कार्यक्रम, सिनेमे, फिल्म्स, डिजिटल वर्तमानपत्रे यांच्यावर प्रेस काऊंन्सिल, केबल टेलिव्हिजन, सेन्सॉर बोर्डचा कायदा लागू होत नसल्याचे यावेळी प्रकाशक जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी त्यांनी ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित झालेल्या काही सिरीयल्सच्याबाबत ब-याच तक्रारी आल्या असून त्याची माहिती घेतली असल्याचे सांगितले आहे. तसेच या तक्रारींची दखल घेतली असून लवकरच त्यांच्या कंटेटच्या नियमनासाठी करण्यात येणा-या व्यवस्थेची घोषणा केली जाईल, असे प्रकाशक जावडेकर यांनी सांगितले.

ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित झालेल्या पाताल लोक, आश्रम, तांडव अशा सिरीज वादग्रस्त ठरल्या आहेत. ठराविक समूहांच्या धार्मिक भावना या सिरीजमार्फत दुखावल्या जात असल्याची तक्रारी काही समूहांनी केल्या आहेत. सध्या हिंदू समूहाच्या भावना दुखावल्यामुळे तांडव वादाच्या भोव-यात सापडली असून #BanTandav असे हॅशटॅग्स समाजमाध्यमांवर ट्रेंडींगला होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.