Crime news : उर्से टोल नाक्यावर 62 लाखांचा बनावट दारूचा साठा जप्त

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई माहामार्गावरील उर्से टोलनाका येथे पोलिसांनी तब्बल 62 लाख 68 हजार रुपयांचा बनावट दारूचा साठा जप्त (Crime news) केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या तळेगाव दाभाडे विभागाने शुक्रवारी (दि.27) केली.

या कारवाईत पोलिसांनी  गामित सोमवेलभाई सिंगाभाई (वय 25वर्षे,व्यवसाय ट्रक चालक रा- ओटा ता. सोनगड जि. तापी गुजरात) व  मोहन दिनराम खथात (वय 34 वर्षे व्यवसाय-ट्रक क्लिनर रा- रुध्रपुरा ता. हुरडा जि. भिलवाडा, राजस्थान) यांना अटक केली आहे.

Talegaon Dabhade : इंद्रायणी बी फार्मसी महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा चढता आलेख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार शुक्रवारी उर्से टोलनाका येथे सापळा लावण्यात आला व जड वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली. तेव्हा एका कंटेनरमध्ये आठशे बॉक्स आढळले. त्यात  43 हजार दोनशे रॉयल ब्लु माल्टच्या बॉटल आढळल्या.

गोवा राज्य निर्मित आणि फक्त गोवा राज्यात विक्रीकरता हा गोवा बनावट मद्य साठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. अटकेतील गामीत सिंगाभाई गुजरातचा तर मोहन खताथ हा राजस्थानमधील आहे. त्यामुळं या टोळीचा गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र असं कनेक्शन असल्याचा उत्पादन शुल्क विभागाला संशय आहे.पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तपासी पथक (Crime news) करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.