Mathadi workers News : माथाडी कामगारांच्या मुजोरीला बसणार आळा, पोलिसांनी जाहीर केला हेल्पलाईन नंबर

एमपीसी न्यूज –  अनधिकृत माथाडी कामगार व त्यांच्याकडून होणाऱ्या दमदाटीला आळा बसवण्यासाठी पिंपरी-चिंचव़ड पोलिसांनी आता कंबर कसली असून काल (शनिवारी) ट्विटरद्वारे एक हेल्पलाईन नंबर जाहिर करण्यात (Mathadi workers News) आला आहे. ज्यामध्ये पोलिसांना थेट कंपन्या किंवा त्यांचे सप्लायर व्हाटसअपद्वारे संबंधीत माथाडी कामगाराची तक्रार करु शकतात.

पिंपरी-चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी औद्योगीक नगरीतील उद्योगांच्या समस्यांवर भर दिला असून उद्योग क्षेत्रात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. काही दिवसांपूर्वीच उद्योगांना संरक्षण देऊ अशी हमी पोलिसांनी उद्योजकांना दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता उद्योग क्षेत्रात जे अनिधिकृत माथाडी कामगार आहेत त्यांच्या द्वारे जी दमदाटी होते किंवा काहीवेळा खंडणी घेतली जाते त्यावर आळा बसवला जाणार आहे. त्यासाठी तक्रार दारांना त्वरीत ही माहिती पोलिसांच्या 9529691966 या व्हॉटसअप क्रमांकावर देता येणार आहे. तक्रारीनंतर त्वरीत जवळच्या पोलीस ठाण्याकडून संबंधित माथाडी कामगारावर गुन्हा दाखल करत कठोर कारवाई केली जाणार आहे.

Crime news : उर्से टोल नाक्यावर 62 लाखांचा बनावट दारूचा साठा जप्त

 

काही दिवसांपूर्वीच हिंजवडी येथे एका माथाडी कामगाराने इन्फोसीस या नामांकित कंपनीत जाणारा माल अडवून गाडी चालकाकडून जबरदस्ती पैसे उकळले होते. यासंबंधी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल कऱण्यात आला आहे. कंपनीत जाणारा माल अडवणे, दमदाटी करणे,ठरावीक परिसर निवडून तेथे स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणे अशा तक्रारी माथाडी कामगारांच्या पोलिसांकडे येतात. त्यातील अनेकजण हे अनधिकृत असताता त्यामुळे त्यांना आळा घालण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

पिंपरी-चिंचवड यांनी या उपक्रमाची ट्विटरद्वारे माहिती देताच काही नागरिकांनी याचे कौतुक केले आहे तर काहींनी पोलिसांनी साध्या वेशातील गस्त वाढवावी, कंपनी बरोबरच रेल्वे स्थानक अशा परिसरातील माथाडी कामगारांच्या मुजोरीला आळा घालावा अशी मागणी (Mathadi workers News) केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.