Pune News : पोटच्या मुलांना नग्न करून मारहाण; वडिलांच्या तक्रारीनंतर आई विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- स्वतःच्या अकरा आणि आठ वर्षीय मुलांना घरात कोंडून ठेवून आणि नग्न करून मारहाण केल्याप्रकरणी महिलेविरोधात (Pune News ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या पतीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. 40 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. शिवाजीनगर येथील फॅमिली कोर्टात त्यांच्या घटस्फोटा संदर्भात केस चालू आहे. या दोघांनाही अकरा वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाचा मुलगा आहे. हे दोघेही आरोपी महिलेकडे राहतात. आरोपी महिलेने स्वतःच्याच मुलांना नग्न करून मारहाण केली. दोघांना घरात कोंडून ठेवून ती स्वतः बाहेर गेली. मुलगा आणि मुलगी या दोघांनाही नग्न करून घराच्या बाहेर उभे केले आणि बिल्डिंगच्या खाली फेकून देण्याची धमकी दिली.
दरम्यान सतत शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याने अकरा वर्षाच्या मुलीला मानसिक उपचाराची गरज पडून ,तिला त्रासाला सामोरे जावे लागले असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा (Pune News )दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.