Dapodi News: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त पिंपरी युवासेनेकडून रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त पिंपरी युवासेनेकडून उद्या (गुरुवारी) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दापोडी येथे होणाऱ्या रक्तदान शिबिराचे मावळ युवासेनेचे विस्तारक राजेश पळसकर व पिंपरी-चिंचवड युवासेना शहर प्रमुख विश्वजित बारणे यांच्या हस्ते उद्या सकाळी 11 वाजता उदघाटन होणार आहे. तसेच नागरिकांना 2.50 लाख रुपयाचा अपघाती विमा ही देण्यात येणार आहे. पिंपरी युवासेनेचे युवा अधिकारी निलेश हाके यांच्या जनसंपर्क कार्यालय जवळ हा कार्यक्रम होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे युवासैनिक, शिवसैनिक व नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे. रक्तदान करावे असे आवाहन पिंपरी युवासेनेकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.