Crime News : सुनेने केला गळा आवळून सासूचा खून; सुनेला पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – सासू – सुनेचे भांडण विकोपाला गेल्यानंतर सुनेनेच 71 वर्षीय सासूचा दोरीने (Crime News)  गळा आवळून खून केला आहे. हा प्रकार चाकण येथे गुरूवारी (दि. 14) घडला. पोलिसांनी सुनेला अटक केली आहे.

 

 

सुषमा अशोक मुळे (वय 71) असे सासूचे नाव असून सुवर्णा सागर मुळे (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

 

 

 

सासू सुषमा आणि सुवर्णा यांच्यात नेहमी किरकोळ कारणांवरून भांडणे होत होती. आरोपी सुवर्णा ही तिचा मुलगा सासुजवळ ठेऊन गप्पा मारत असल्याची तक्रार कायम सुषमा करत होत्या. शुक्रवारीही पती कामावरून आले असता स्वयंपाक वेळेवर झाला नाही म्हणून सासु-सुनेत भांडण झाले. हे भांडण विकोपाला गेल्यानंतर सुवर्णाने नायलॉन दोरीने गळा (Crime News)  आवळून सासूची हत्या केली. पोलिसांनी सुवर्णाला बेड्या ठोकल्या असून चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.