Pune : विजेच्या खांबाचा शॉक लागून 12 वर्षीय निष्पाप मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- इलेक्ट्रॉनिक खांबाचा शॉक लागून 12 वर्षीय  मुलाचा शॉक दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 18 ऑगस्टला सकाळी 6 वाजता मुंबई-बेंगलोर हायवे शेजारील सर्व्हिस रोडच्या फुटपाथलगत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल विठ्ठल चव्हाण (वय 38, रा. वारजे माळवाडी) यांचा मुलगा पृथ्वीराज विशाल चव्हाण(वय 12) हा हॉटेल स्वराज स्नॅक्स सेंटरच्या समोर मुंबई-बेंगलोर हायवे शेजारील सर्व्हिस रोडच्या फुटपाथलगत जॉगिंग ट्रॅकवर खेळत असताना बाजूला असलेल्या लाईटच्या इलेक्ट्रिक खांबाचा शॉक लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांनी विद्युत निरीक्षक एम. एस. सी. बी. कार्यालय यांना रिपोर्ट पाठविला असता सदर इलेक्ट्रॉनिक खांब हा पुणे महानगर पालिकेचा असल्याचे निष्पन्न झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.