Deepak Sapke : दीपक सपके यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत युवा नेते दीपक सपके (Deepak Sapke)यांचा समर्थकांसह बुधवारी (दि.26) शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी अजित नायर, सचिन सपके, हेमंत बचाव, रितेश शिंदे, आदित्य कुलकर्णी, व इतर मित्र परिवार उपस्थित होता.

समर्थकांसह माजी पोलीस अधिकारी व बार्शी तालुक्याचे प्रस्थ भाऊसाहेब आंधळकर यांनीही आपल्या बार्शी तालुक्यातील समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. उल्हासनगर, कल्याण, ठाणे, डोंबिवली युवकांचे प्रेरणास्थान व डी एस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दीपक सपके यांचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश झाला.

Mula River : मुळा नदी पुनरूज्जीवन प्रकल्प; पुणे, पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे संयुक्त निविदा

दिपक सपके यांचे पिंपरी चिंचवड, नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, औरंगाबाद, यवतमाळ जिल्ह्यांसह राज्यभरात अनेक ठिकाणी दीपक सपके यांचे मोठे सामाजिक कार्य आहे. यावेळी बोलताना दीपक सपके (Deepak Sapke) म्हणाले, की अनेक वर्ष सामाजिक कार्य केल्यानंतर आता राजकीय क्षेत्रातही पाऊल टाकले आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.