Pune Crime : म्हशीच्या रेडकावर अनैसर्गिक अत्याचार; नेपाळी व्यक्तीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : सांस्कृतिक शहर ओळख असलेल्या (Pune Crime) पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 38 वर्षीय व्यक्तीने म्हशीच्या रेडकावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हा सगळा प्रकार पुण्यातील नदीपात्र रस्त्यालगत घडला आहे. याप्रकरणी एका 38 वर्षीय नेपाळी व्यक्तिविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय व्यक्ती ही नेपाळची असून पुण्यात स्थायिक आहे. हा सगळा प्रकार मुठा नदीपात्र जवळील असलेल्या रस्त्यावर घडला. हा व्यक्ती म्हशीच्या रेडकूवर अनैसर्गिक कृत्य करत होता. हे काही स्थानिकांना निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांना त्याला बेदम मारहाण केली. यात तो बेशुद्ध झाला. पोलिसांनी त्याला सासून रुग्णालयात तात्काळ दाखल केले असून पोलिस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहे

या व्यक्तीवर भारतीय दंड विधान 377 कलमअंतर्गत (Pune Crime) अनैसर्गिक अत्याचाराचा तसेच वन्यजीव प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.