Pune Crime : निर्जनस्थळी घेऊन जात मारहाण करून प्रवाशांना लुबाडले; रिक्षा चालकांना अटक

एमपीसी न्यूज : उत्तर प्रदेशाहून पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Crime) पहाटेच्या सुमारास आलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्याचे आमिष दाखवून निर्जन स्थळी घेऊन जात मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. 450 रुपये भाडे ठरले असताना आरोपी रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून तब्बल सहा हजार रुपये लुबाडले.

प्रदीप सिद्धेश्वर क्षीरसागर (वय 40), सुजित बाबासाहेब लाटे (वय 28) अशी अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकांची नावे आहेत. तर आणखी एक रिक्षा चालक दत्ता मोहिते हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, उत्तर प्रदेश येथून बुधवारी पहाटेच्या सुमारास काही प्रवासी पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. त्यांना कुरकुंभ या ठिकाणी जायचे होते. पुणे रेल्वे स्थानकावरील दोघा रिक्षा चालकांनी आणि एका अनोखी व्यक्तीने रिक्षा भाड्याने देतो असे सांगून त्यांना रिक्षात बसवले. प्रत्येक प्रवाशाकडून रिक्षा भाडे म्हणून 450 घेण्याची ठरले. मात्र, काही अंतर गेल्यानंतर त्यांनी निर्जनस्थळी रिक्षा थांबवली आणि रिक्षातील (Pune Crime) अनोखी व्यक्तीने या प्रवाशांना काठीने मारहाण करत त्यांच्या जवळील 6600 रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि प्रवाशांना रस्त्यात सोडून हे सर्व रिक्षावाले निघून गेले.

Pune Crime : म्हशीच्या रेडकावर अनैसर्गिक अत्याचार; नेपाळी व्यक्तीवर गुन्हा दाखल

यानंतर या पाचही प्रवाशांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात येऊन घडलेल्या सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी ही तात्काळ गुन्ह्याची नोंद करत प्रवाशांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे रिक्षा चालकांच्या शोध सुरू केला. पुण्यातील कॅम्प परिसरातून दोघा रिक्षा चालकांना ताब्यात घेण्यात आले तर एक रिक्षा चालक रिक्षा सोडून पळून गेला. बंडगार्डन पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.