Pune Crime : भावा भावाच्या भांडणात एकाचा खून; पुणे जिल्हा हादरला

एमपीसी न्यूज : धाकट्या भावाने (Pune Crime) दिलेल्या पैशाचा जाब विचारल्याने झालेल्या भांडणातून मोठ्या भावाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे 28 ऑक्टोबरच्या रात्री ही घटना घडली. कल्पेश अरुण धुळप (वय 26) असे खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. तर, मंथन अरुण धुळप (वय 23) या धाकट्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरेखा अरुण धुळप यांनी फिर्यादी दिली आहे.

Pune Crime : निर्जनस्थळी घेऊन जात मारहाण करून प्रवाशांना लुबाडले; रिक्षा चालकांना अटक

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मंथन धुळप त्याने मोठा भाऊ कल्पेश याला चप्पल व्यवसायासाठी आठ दिवसांपूर्वी एक लाख चाळीस हजार रुपये दिले होते. शुक्रवारी रात्री त्याने भावाला या पैशासंबंधी विचारणा केली. त्यावर कल्पेशने हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे सांगितले. यावरून धोका भावात राग आला. कल्पेशने मंथन याला हाताने मारहाण केली. ते सहन न झाल्याने मंथन याने घरातील चाकू काढून कल्पेश त्याच्या मानेवर आणि छातीवर वार केले.

यामध्ये गंभीर जखमी झाल्याने कल्पेशचा मृत्यू झाला. घटनेची माहिती (Pune Crime) मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मंथन याला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.