Defence Minister : भारताची 38 हजार चौरस किलोमीटर जमीन चीनच्या ताब्यात – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज संसदेत बोलत होते.

एमपीसी न्यूज – लडाखमधील भारताची 38 हजार चौरस किलोमीटर जमीन अनधिकृतपणे चीनने बळकावली आहे. त्याशिवाय 1963 साली तथाकथित सीमा करारांतर्गत पाकिस्तानने पाक व्याप्त काश्मीरमधील 5,180 चौरस किलोमीटरचा भूभाग बेकायदेशीररित्या चीनकडे सोपवला, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली.

पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज संसदेत बोलत होते.

सीमा प्रश्न एक जटिल मुद्दा आहे हे भारत आणि चीन दोघांनी औपचारिकरित्या मान्य केले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी संयमाची आवश्यकता आहे तसेच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच या मुद्याचे निष्पक्ष, परस्पर सहमतीने समाधान निघू शकते, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल जवळ दोन्ही देश सैन्याची तैनाती कमी ठेवतील असा 1993 आणि 1996 मध्ये झालेल्या करारात उल्लेख आहे.

सीमा प्रश्नी जो पर्यंत तोडगा निघत नाही, तो पर्यंत लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोलचा आदर ठेवायचा, उल्लंघन करायचे नाही असे सुद्धा करारात म्हटले असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.