Dehu Election update: देहू नगरपंचायत निवडणूक; प्रभाग क्रमांक पाचमध्ये अभिजीत काळोखे यांची प्रचारात मुसंडी

एमपीसी न्यूज – देहू नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिजित अभिमन्यू काळोखे यांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी रॅली काढली होती. या रॅलीत आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
अभिजित काळोखे यांनी घरोघरी जाऊन प्रचार करून मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्यावर भर दिला. कार्यकर्त्यांचा संच, प्रचाराचे नियोजन, प्रभागातील मतदारांशी असलेला दांडगा संपर्क व केलेली कामे याच्या जोरावर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात असताना आमदार सुनील शेळके व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्याच्यासाठी व देहूच्या विकाससाठी एक मत राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे अवाहन अभिजित काळोखे यांनी केले.
अभिजित काळोखे यांनी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी भाविकांची सेवा व अन्नदान उपक्रम राबविला. विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग, राष्ट्रपुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी, सामाजिक जाणिवेतून पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण उपक्रमात सहभाग, ड्रेनेज लाईनची केलेली विविध कामे, समाजमंदिर उभारणीत पुढाकार, इंद्रायणी नदीवरील बंधारा दुरुस्ती करण्यासाठी पाठपुरवा, देहू-आळंदी रोडच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा, विठ्ठलवाडी येथील अंतर्गत रस्त्यांची कामे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.
कोरोना संकटकाळात गरजूंना अन्न-धान्य वाटप केले. प्रभागात लसीकरण मोहिम राबविली. प्रभागात विविध कामे करण्यासाठी घेतलेले परिश्रम व केलेली कामे हीच शक्ती आपल्या पाठीशी उभी असल्याचे काळोखे यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक पाचमध्ये आमदार शेळके यांनी आज रॅली काढली होती. रॅली मध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभागात अभिजित काळोखे यांनी केलेली कामे व दांडगा जनसंपर्क, वडिलांचा विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून असलेला जनसंपर्क या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.