Dehu News : शासनाच्या नियमानेच तुकाराम बीज सोहळा साजरा करणार – देहू संस्थान

बंडातात्या कराडकरांची भूमिका वैयक्तिक

एमपीसी न्यूज – आम्ही शासनाच्या नियमानेच बीज सोहळा पार पाडणार आहोत. आज संत तुकाराम महाराज असते तर त्यांनी शासनाचीच भूमिका मान्य केली असती. शासकीय नियमांच्या अधीन राहूनच बीज सोहळा पार पाडणार, अशी भूमिका देहू संस्थानाने मांडली. तसेच, वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकरांची भूमिका वैयक्तिक असल्याचेही संस्थानाने म्हटले आहे.

बंडातात्या कराडकर यांनी ‘भजन सत्याग्रह’चा पवित्रा घेत देहूगावच्या वेशीवर दोनशेहून अधिक वारकरी भजन आंदोलन केले. बीज सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांनी देहूत यावं, असं आवाहन बंडातात्यांनी नुकतंच केलं होतं. त्यानुसार आज देहूच्या वेशीवर महाराष्ट्राच्या काही भागातून वारकरी आले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ 50 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयाविरोधात देहूच्या वेशीवर आंदोलनाची हाक दिली. व्यवस्थापन देहूच्या आत असून आम्ही देहूच्या वेशीवर आंदोलन करणार आहे असंही बंडातात्या म्हणाले.

जोपर्यंत आत सोडत नाही, तोपर्यंत इथेच बसणार होतो. मात्र, शासनाला वेठीस न धरता आम्ही सर्वांनी हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय, असे सांगत बंडा तात्या कराडकर यांनी आजचं आंदोलन स्थगित केलं. यावेळी पोलीस प्रशासनाने वारकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कराडकर यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.