Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 4 नवे रुग्ण; 4 कोरोनामुक्त

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज,मंगळवारी कोरोनामुक्त झालेल्या चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर चार नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यामध्ये श्रीविहार सोसायटी येथील 3 आणि शगुन सोसायटी येथे एका रुग्णाचा समावेश आहे.

बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज,मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1272 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आजपर्यंत एकूण 1190 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 18 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 21 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या 48 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 9 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 34 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.