Maharashtra Corona Update : राज्यात आज 8,151 नवे रुग्ण, 213 मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज 8 हजार 151 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर, 213 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 लाख 9 हजार 516 एवढी झाली आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण कोरोना बाधित रुग्णापैकी 13 लाख 92 हजार 308 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात सध्या एकूण 1 लाख 74 हजार 265 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज दिवसभरात 7 हजार 429 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 86.05 टक्के एवढं झाले आहे.

राज्यात आज दिवसभरात 213 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यात 42 हजार 453 एवढे रुग्ण दगावले आहेत. राज्याचा मृत्यूदर सध्या 2.64 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आजवर 82 लाख 51 हजार 234 नमूणे तपासण्यात आले आहेत त्यापैकी 16 लाख 9 हजार 516 नमूणे सकारात्मक आले आहेत.

राज्यात सध्या 24 लाख 34 हजार 687 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 23 हजार 488 संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.