Dehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 6 जणांना डिस्चार्ज ; नव्या रुग्णवाढीला ब्रेक

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत कोरोना रुग्णवाढीला आज , बुधवारी ब्रेक लागला. त्यामुळे एकाही नव्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. त्याचवेळी कोरोनामुक्तांची संख्यावाढ कायम राहिली. आज कोरोना उपचारातून बरे झालेल्या एकूण सहा रुग्णांना घरी सोडण्यात आले.

बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1234 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आज कोरोनातून बरे झालेल्या सहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आजपर्यंत एकूण 1177 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 9 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 5 रुग्णांवर, तर पीसीएमसी कोविड सेंटर येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. सध्या 23 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी  8 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 34 इतकी झाली आहे.

‘देहूरोड कॅन्टोमेन्ट हद्दीत राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेनंतर कोरोना बाधित रुग्णांमध्ये घट दिसून येत आहे. त्याचबरोबर या मोहिमेपूर्वी दररोज सुमारे 90 ते 100 कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. त्याचे प्रमाण आता केवळ 30 ते 35  इतके आहे. नव्या रुग्णांची वाढ कमी झाली ही समाधानाची बाब आहे. असे असले तरी प्रत्येकाने कोरोना बाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. कुणीही विना मास्क घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, वारंवार हात धुवावे, तसेच सॅनिटायझरचा वापर करावा’. रामस्वरुप हरितवाल – मुख्य कार्यकारी अधिकारी, देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्ड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.