Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत तीन कोरोनामुक्त; दोन नवे रुग्ण; शनिवारी थॉमस कॉलनी, मामुर्डी परिसरात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. आज, शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. हे दोन्ही रुग्ण किन्हई येथील आहेत.

दरम्यान, आज ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ह्या मोहिमेअंतर्गत शेलारवाडी, कोटेश्वरवाडी, शेलारमळा, संकल्प नगरी, इंद्रपूरम, एल्लोरा सोसायटी, वृंदावन सोसायटी, लक्ष्मी पुरम, श्रीकृष्ण नगर, शितळानगर नं. 2, कुणाल हॉटेल परिसर या भागातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली.

तसेच एकूण 130 नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1277 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आजपर्यंत एकूण 1197 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 28 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 10 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या 46 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 8 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 34 इतकी झाली आहे.

दरम्यान, उद्या, शनिवारी (दि. 24) थॉमस कॉलनी, मामुर्डी, शितळानगर नगर नं. 1 या भागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील सर्व नागरिकांनी आपापली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. रघुवीर शेलार- उपाध्यक्ष ,  देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.