-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसऱ्याला होणारे शस्त्रपूजन व पथसंचलन रद्द

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमीला पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी शस्त्रपूजन व पथसंचालनाचे आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून संघाने जाहीर स्वरूपातील शस्त्रपूजन उत्सव आणि पथसंचलनाचे कार्यक्रम रद्द केले आहेत.

पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे संघचालक डॉ. गिरीश आफळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

यावर्षी कोरोनामुळे विजयादशमीचा उत्सव ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक शाखा स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संघाचे स्वयंसेवक समाज तसेच कुटुंब प्रबोधनपर व्याख्यानमाला, रक्तदान शिबिरे, निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य, चित्रकला इत्यादी स्पर्धा यासारखे अनेक समज जागरणाचे कार्यक्रम आयोजीत करत आहेत.

या सर्व कार्यक्रमामध्ये विविध वयोगटातील बाल, तरुण, महिला यांना मोठ्या संख्येने सहभागी होता येणार असून या उपक्रमांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी संघ गेली नऊ महिन्यांपासून सोशल डिस्टंसिंग व इतर सर्व नियमांचे पालन करत प्रशासनासोबत विविध सामाजिक उपक्रम द्वारे सक्रीय आहे.

गरजुंना जेवणाचे डबे व अन्नधान्य पुरवठा, स्थलांतरिताना सहाय्य, कोरोना तपासणी अभियान, प्रतिबंधक उपाययोजना, मदत कार्य, रक्तदान शिबिरे इत्यादी उपक्रमांचे प्रभावी आयोजन करीत आहे.

रविवारी (दि. 25) सकाळी 8 वाजता नागपूर येथील संघ मुख्यालयात विजयादशमी निमित्ताने ऑनलाईन साजरा होणार आहे. यानिमित्ताने आयोजित सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.