Pune: मोहन भागवत यांची शिवसृष्टीला भेट

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज  पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे(Pune) यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ला भेट दिली.  
शिवसृष्टीचे विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, अमृत पुरंदरे, (Pune)सुनील मुतालिक, श्रीनिवास वीरकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचारक अण्णा वाळिंबे, मनोज पोचट, संदीप जाधव आणि शिवसृष्टीचे व्यवस्थापक अनिल पवार आदी यावेळी उपस्थित होते. शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ आणि शाल देत भागवत यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मोहन भागवत यांनी तब्बल तीन तास शिवसृष्टी पाहिली. 21 एकरच्या परिसरात काय काय होणार आहे याची त्यांनी संपूर्ण माहिती घेतली आणि सूचनाही केल्या.  पहिल्या टप्प्याच्या पूर्ण झालेल्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच पुढील तीन टप्प्यांच्या कामाची माहिती त्यांनी घेतली.

LokSabha Elections 2024 : निवडणुकीतील गैरप्रकारांवर 135 भरारी पथके आणि 129 स्थिर सर्वेक्षण पथकांचे लक्ष

यावेळी बोलताना भागवत म्हणाले, “छत्रपतींचा इतिहास फक्त अफजलखान वधापासून शाहिस्तेखानाची बोटे तोडण्यापुरता मर्यादित नसून हिंदवी स्वराज्य निर्माता, म्हणून त्यांच्या इतिहासाचे दर्शन शिवसृष्टीच्या माध्यमातून झाले पाहिजे. स्वतःचे राज्यविस्ताराचे स्वप्न त्यांनी पाहिले नाही,आपल्या प्रमाणे इतरांनी आपला राज्यविस्तार करावा हीच शिकवण त्यांनी दिली. शेती , व्यापार , स्वधर्म  आणि स्वभाषा यांचा विचार त्यांनी केला.”
गेल्या ३५० वर्षात छत्रपतींचा विचार घेऊन पेशवे, होळकर, गायकवाड यांच्या प्रमाणे राजपुतांनी देखील संघर्ष केला स्वातंत्र्या नंतरही हा विचार पुढे नेला गेला हे येथील विविध प्रदर्शनीतून दिसेल अशा विश्वास देखील मोहन भागवत यांनी व्यक्त केला.
यावेळी विश्वस्त जगदीश कदम यांनी भागवत व उपस्थित सर्वांना प्रकल्पाची माहिती दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.