Pimpri: संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान व महाराष्ट्र शाहीर परिषदेचे बाल शाहीर पुरस्कार व महिला शाहीर पुरस्कार नुकतेच जाहीर

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान व महाराष्ट्र शाहीर परिषद(Pimpri) यांचे वतीने दिले जाणारे बाल शाहीर पुरस्कार व महिला शाहीर पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.
हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी (दि.27) सायंकाळी 7 वाजता संत तुकाराम मंदिर, (Pimpri)संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रसंगी सर्व पुरस्कारप्राप्त शाहीरांचे पोवाडयाचे कार्यक्रम सादर होणार आहेत.
पुरस्कार प्राप्त बाल शाहीर
1) नमन महादेव कांबळे, रा. थेरगाव
2) पुष्पराज विकास ननावरे, रा. थेरगाव
3) कुमारी अश्लेषा सत्यवान पडवेकर, रा. निगडी
पुरस्कार प्राप्त महिला शाहीर
1) सी. प्रेयसी गुरुराज कुंभार, रा. चिंचवड
वादक विशेष पुरस्कार
1) वैभव कैलास गोरखे, संबळ वादक, रा. थेरगाव

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.