Dehuroad : मटण तोडण्याच्या कोयत्याने दोघांवर वार

एमपीसी न्यूज – रस्त्याने जात असलेल्या दोघांना आवाज देऊन त्यांना शिवीगाळ करत तलवार आणि मटण तोडण्याच्या कोयत्याने वार केले. ही घटना देहूरोड येथे शिवाजी विद्यालयाच्या मागे शुक्रवारी (दि. 2) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

संदीप खणसे, संतोष खणसे, सुरेश अवचिते, बुग्गी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुशांत जालिंदर पोळके (वय 23, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत आणि त्यांचा मित्र विकी याच्यासोबत देहूरोड मधील शिवाजी विद्यालयाच्या मागच्या बाजूच्या रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी आरोपी सुरेश याने सुशांत यांना आवाज देऊन बोलावून घेतले. ‘तुला लय माज आला आहे काय’ असे म्हणत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. याला सुशांत यांनी विरोध केला असता चौघांनी मिळून तलवार आणि मटण तोडण्याच्या लोखंडी कोयत्याने सुशांत आणि त्यांचा मित्र विकी दोघांना मारहाण करत वार केले. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.