Maval : कार अपघातातील बेपत्ता तरुणाचा शोध घेताना तीन दिवसांपासून बेपत्ता इसमाचा मृतदेह इंद्रायणीत सापडला

अक्षय जगताप अजूनही बेपत्ताच

एमपीसी न्यूज – नाणे मावळ येथील एक रहिवासी तीन दिवसांपासून बेपत्ता होता. बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आज (शनिवारी ) सकाळी इंद्रायणी नदीपात्रात आढळला.

राहुल आंद्रे (रा. नाणे मावळ) असे मृतदेह आढळलेल्या इसमाचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकवे बु. गावाजवळ इंद्रायणी नदीपात्रात गुरुवारी एक कार उलटली. त्यामध्ये तिघेजण होते. एकजण पोहून बाहेर आला. दुस-याचा मृतदेह कारमध्ये आढळला. तर तिसरा तरुण अजूनही बेपत्ता आहे. बेपत्ता असलेल्या तरुणाचा शोध मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांकडून घेण्यात येत आहे. कार अपघातात बेपत्ता असलेल्या तरुणाचा सलग तिस-या दिवशी शोध सुरु आहे.

बेपत्ता तरुणाचा शोध घेत असताना इंद्रायणी नदीमध्ये राहुल आंद्रे या इसमाचा मृतदेह आढळला. कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणे मावळ येथील हा रहिवासी आहे. आंद्रे यांच्या मृत्यूबाबत कुठलीही शक्यता अद्याप वर्तवण्यात आलेली नाही. त्यांच्या नातेवाईकांना याबाबत कळवण्यात आले आहे. पुढील कारवाई सुरु आहे. तसेच कार अपघातातील बेपत्ता असलेल्या अक्षय जगताप या तरुणाचा देखील शोध सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.