Dehuroad News: युवा सेनेतर्फे सावित्रीच्या लेकींचा गौरव विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान

एमपीसी न्यूज: सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून युवा सेनेचे उपजिल्हाअधिकारी दिपक शरद भोंडवे आणि ऍड. पूजा दिपक भोंडवे यांच्या वतीने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर नावलौकिक मिळविणाऱ्या तसेच लोकाभिमुख कार्य करणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा गौरव करण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले जयंती ते राष्ट्रामाता जिजाऊ जयंती या कालावधीत हा सन्मान सोहळा सुरु आहे.

या उपक्रमांतर्गत बुधवारी (दि. 5) किवळे, बापदेव नगर येथील ग्लोबल स्कूलमधील मुख्याध्यापिका आणि शिक्षकांचा ‘वेळेचे व्यवस्थापन’ हे पुस्तक आणि पुष्प देऊन दीपक भोंडवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका विजय येवते, ज्योती इंगळे, आरती कडू, मोनिका आगरवाल, उज्वला ढवळे, हेमांगी धमणे, मनाली शिंदे, राजश्री वान्हेरे, अश्विनी माळी, वैशाली इंगळे, मंगल कडलग, देवई दीक्षित, जान्हवी पवार, शांता सुतार आदी उपस्थित होते.

दिपक भोंडवे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज सर्वच क्षेत्रात महिला आपले कर्तृव गाजवीत आहेत. वकील, डॉक्टर, शिक्षिका, समाजसेविका अशा विविध माध्यमातून महिलांकडून समाज घडविण्याचे कार्य सुरु आहे. महिला शिक्षिका विद्यार्थ्यांच्या माधमातून देशाची भावी पिढी घडविण्याचे कार्य करीत आहेत. अशा सर्वच सावित्रीच्या लेकींचा यथोचित सन्मान करणे आमचे कर्तव्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.