Dehuroad : फूस दाखवून ज्येष्ठ नागरिकाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – महिलेच्या वधु-वर सूचक केंद्रात (Dehuroad) येऊन तिच्याशी ओळख निर्माण करत तिला आयुष्यभर सांभाळण्याचे आमिष दाखवले. यातून 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार चार वर्षांपासून सप्टेंबर 2022 या कालावधीत देहूरोड परिसरात घडला.

सतीश अग्रवाल (वय 65, रा. मेन बाजार देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 43 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Wakad : जाब विचारला म्हणून चाकुने केले वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने वधु-वर सूचक मंडळ (Dehuroad) सुरु करण्यासाठी घोरावडेश्वर मंदिराच्या पायथ्याला एक व्यावसायिक गाळा भाड्याने घेतला होता. तिथे आरोपीने येणे-जाणे होत असे. त्यातूनच दोघांची ओळख झाली. आरोपीने फिर्यादीला आयुष्यभर सांभाळण्याचे त्यांच्या मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्या अमिषातून त्याने महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.