Dehuroad : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दोन दुचाकींची सामोरा समोर (Dehuroad) धडक झाली. यामध्ये एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता विकासनगर, देहूरोड येथे घडली.

आशितोष वसंतराव हिरे (वय 25, रा. किवळे गाव, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महेश विठ्ठल चव्हाण (वय 45, रा. किवळे गाव, पुणे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल अरुण नलावडे (वय 35, रा. देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : आईसोबत बोलल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मेहुणा आशितोष हिरे त्याच्या दुचाकीवरून (एमएच 12/एसएस4556) विकासनगर येथून घराकडे येत होता. त्यावेळी त्याच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने आलेल्या आरोपी अतुल याने त्याच्या ताब्यातील (Dehuroad) दुचाकीने (एमएच 14/डी डब्ल्यू 1213) धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन आशितोष याचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.