Chinchwad : आईसोबत बोलल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – आईसोबत बोलल्याच्या कारणावरून (Chinchwad) दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता भोईरनगर, चिंचवड येथे घडली.

गौरव ज्योतीराम जोगदंड (वय 20), कुणाल बाळू कांबळे (वय 19, दोघे रा. दळवीनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुदर्शन दत्ता सूर्यवंशी (वय 24, रा. दळवीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन हे 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भोईरनगर येथील जयवंत माध्यमिक विद्यालय येथे थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी कुणाल कांबळे याने ‘माझ्या आईशी कां बोलतो’ असे म्हणत सुदर्शन यांच्या हातावर सिमेंटच्या गट्टूने मारले.

Sangavi : आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून टोळक्याकडून एकास मारहाण

तर गौरव याने ‘माझ्या मामीशी बोलायचे नाही’ असे म्हणत सिमेंटच्या ब्लॉकने सुदर्शन यांच्या डोक्यात मारून जखमी केले (Chinchwad ) असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.