Dehuroad : रेल्वेच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – धावत्या रेल्वेच्या धडकेत अज्ञात इसमाचा मृत्यू झाला. ही घटना आज (रविवारी) पहाटे दोनच्या सुमारास देहूरोड रेल्वे स्थानकाजवळ घडली.

रेल्वे पोलीस पुरुषोत्तम करदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस – कोयम्बतुर (कोयम्बतुर एक्सप्रेस) या गाडीची धडक बसून अज्ञात इसमाचा मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली.

मयत झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून त्याचे वय अंदाजे 35 वर्ष आहे. त्याने अंगात फिकट गुलाबी रंगाचा हाफ टी-शर्ट, आत पांढरी सँडो बनियन, निळ्या रंगाची शिवशक्ती कंपनीची ट्रॅक पॅन्ट घातली आहे. उंची 5 फूट 5 उंच असून रंग गोरा, नाक सरळ, केस काळे आहेत. या व्यक्तीबाबत माहिती असल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.