Delhi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

एमपीसी न्यूज – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना  ( Delhi) आज  सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आली. आज संध्याकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले .त्यानंतर साधारण दोन तासांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक केली. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

Pune : वाहनांची तोडफोड करणाऱ्या अल्पवयीन 9 बालकांसह पालकांविरुध्द गुन्हा दाखल

दिल्ली कथित मद्य घोटाळा  प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना  ईडीकडून   17 मार्च रोजी नववे समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, ते एकदाही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. याचवेळी ईडीने पाठविलेली सर्व समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याचे टाळले होते. तसेच केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी एक याचिका दाखल ( Delhi) केली होती. अखेर आज त्यांना अटक करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.