Delhi : दिल्ली-एनसीआरमध्ये रात्री उशिरा भूकंपाचे धक्के, नेपाळमध्ये हाहाकार… 70 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : रात्री उशिरा दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे (Delhi) जोरदार झटके बसले. भूकंप इतका जोरदार होता की लोक घाबरले. भूकंपाचे धक्के 30 ते 40 सेकंद सतत जाणवत होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 इतकी मोजली गेली.

भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. भूकंपाची वेळ रात्री 11.32 च्या सुमारास होती. भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजला आहे. येथे भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे 70 जणांना जीव गमवावा लागला.

Today’s Horoscope 04 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

भूकंपामुळे नेपाळमधील जाजरकोट आणि रुकुम पश्चिम भागातील अनेक इमारती कोसळल्या. भूकंपामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. भूकंपातील मृतांचा आकडा वाढू शकतो, असे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशसह बिहारमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोक घराबाहेर पडले. बरेच लोक आपल्या मुलांना हातात घेऊन पळू लागले. (Delhi)

एनसीआरमधील बहुमजली इमारतींमध्ये राहणारे लोक त्यांच्या फ्लॅटमधून बाहेर पडले. जणू संपूर्ण इमारतच हादरत असल्याचे लोक म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.