Today’s Horoscope 04 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 04 November 2023 
वार – शनिवार.
4.11.2023
शुभाशुभ विचार- 12 नंतर चांगला दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – पुनर्वसु 7.57 पर्यंत नंतर पुष्य.
चंद्र राशी – कर्क.
—————————–
मेष – ( शुभ रंग- तांबडा )
आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नांत लक्ष देणे गरजेचे वाटेल. मुलांकडूनही आज गोड बोलूनच अभ्यास करून घ्यावा लागेल. गृहिणींना आज गृह उद्योगाच्या विविध कल्पना सुचतील.

वृषभ (शुभ रंग- हिरवा )Today’s Horoscope 04 November 2023 
आज नोकरदारांना बढती बदली विषयी समाचार येऊ शकतात. मुले आज अभ्यासात चाल ढकलच करतील. गृहिणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा करू नये.

मिथुन ( शुभ रंग- लेमन )
आज काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे घरी पाय धुळ झाडतील. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधावा लागेल. खिशात पैसा खेळता असल्याने आज आनंदी व उत्साही असाल.

कर्क (शुभ रंग- पांढरा )
आज स्वतःचेच खरे करू नका. इतरांचेही ऐकून घ्यायची तयारी ठेवा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. आज तुम्ही गोडबोल्या मंडळींपासून सावध राहा.

सिंह (शुभ रंग- मरून )
संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. आज दिवस खर्चाचा आहे. बचतीचा विचारच सोडून द्या. आज गरजेपुरते आध्यात्मिकही व्हाल. प्रवासाचा आनंद लुटाल.

कन्या ( शुभ रंग- क्रीम)
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून जे जे चिंताल ते ते होईल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची आज शक्यता आहे. संध्याकाळी अनपेक्षित खर्च ओढवेल.

Akola : अकोला पश्चिम भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन

तूळ ( शुभ रंग- डाळिंबी)
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. संध्याकाळी सहकुटुंब मौजमजेस प्राधान्य द्याल.

वृश्चिक – (शुभ रंग- पिस्ता )
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. सज्जनांचा सहवास लाभेल. सरकारी कामे मात्र रखडतील. गृहिणी दानधर्म करतील.

धनु ( शुभ रंग – पिस्ता)
कोणतीही धाडसाची कामे आज करू नका. स्वतःला जपा. आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. विश्वासातील व्यक्तीकडूनच विश्वासघात होण्याची शक्यता आहे.

मकर – ( शुभ रंग – गुलाबी)
कौटुंबिक सदस्यांत सामंजस्य असल्याने तुमचे मनोबलही उत्तम असेल. आज जोडीदाराचे हक्क पुरवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. संध्याकाळी कामावरून येताना गाडी हळू चालवा.

कुंभ ( शुभ रंग – आकाशी)
कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमच्या प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. काही येणे असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.

मीन (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
हौशी मंडळी जीवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा व वेळ ही खर्च कराल. गुढ शास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.