Akola : अकोला पश्चिम भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन

एमपीसी न्यूज – अकोला पश्चिम भाजपचे (Akola) आमदार गोवर्धन शर्मा यांचे  आज निधन झाले. ते गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान आज रात्री 8 वाजताच्या सुमारास शर्मा यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या 4 नोव्हेंबर रोजी अकोला शहरातील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

Bhosari : घरगुती गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

लोकनेते आणि राम भक्त म्हणून ते प्रसिद्ध असलेले शर्मा यांचा अयोध्या येथील ‘श्रीराम जन्मभूमी’ आंदोलनात  सक्रिय सहभाग होता. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. अकोला पश्चिम मतदार संघातून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

अकोला शहरातील पाणीटंचाई संदर्भात त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं. जुन्या शहरात शैक्षणिक संस्था उभ्या करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहण्यापासून त्यांनी वाचवलं. तसेच उच्च शिक्षणापर्यंतची सोय देखील त्यांनी (Akola) उपलब्ध करून दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.