Metro : महामेट्रो करणार काँप्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन

एमपीसी न्यूज – शहरातील प्रमुख रस्त्यावरुन तासाला दुचाकी, (Metro) चारचाकी, बस, ट्रक, तीनचाकी अशी किती वाहने धावतात. कोणत्या दिशेने जातात. पादचा-यांचे प्रमाण किती आहे. विशिष्ट वेळेत सीसीटीव्ही कॅम-यांच्या आधारे हा सर्व्हे केला जाणार आहे. ज्या मार्गावर जास्त वर्दळ राहील याचा अंदाज घेऊन नवीन मेट्रो मार्ग विकसित करण्यासाठी पुणे महामेट्रो पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्वंकष वाहतूक आराखडा (काँप्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करणार आहे.

मेट्रोचे कासारवाडी स्थानक वर्दळीचे आहे. नाशिक फाटा येथून नाशिकला आणि चाकणला जाणा-या लोकांची संख्या किती याचा अभ्यास केला जाणार आहे.

नाशिक फाटा ते चाकण आणि वर्तुळाकार रस्त्यांवर (एचसीएमटीआर) ‘निओ मेट्रो’ विकसित करण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आले आहे.

Delhi : दिल्ली-एनसीआरमध्ये रात्री उशिरा भूकंपाचे धक्के, नेपाळमध्ये हाहाकार… 70 जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक कंपन्यामधील अनेक कामगार (Metro) पुण्यातून कंपनीच्या खासगी बसने प्रवास करतात. या कामगारांनी मेट्रोने प्रवास करावा यासाठी त्यांच्याशी चर्चा सुरु आहे. कामगारांनी वल्लभनगरपर्यंत मेट्रोने आणि तेथून खासगी बसने प्रवास करावा असे प्रयत्न सुरु आहेत.

https://youtu.be/DHpPTMZ1YcY?si=qfJh3UmOubSTxnSD

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.