Delhi News : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्स रुग्णालयाच्या अधिका-यांनी याबाबत माहिती दिली आहे.

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत असून, रुग्ण वाढीची दिवसेंदिवस उच्चांकी आकडेवारी समोर येत आहे. अशात नेते मंडळी, कलाकार, खेळाडू यांना देखील कोरोनाची बाधा होत आहे. त्यानंतर आता देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.

दरम्यान, मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना उपाययोजना बाबत पाच सल्ले दिले आहेत. मुख्यत्वे लसीकरणावर भर देऊन त्याबाबत योग्य नियोजन करण्याचा सल्ला मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.