Pimpri : आमदार राम कदम यांचा निषेध करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची महापौरांच्या आसनासमोर धाव

एमपीसी न्यूज – दहीहंडी उत्सावात मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांचा निषेध करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. 

ऑगस्ट महिन्याची तहकूब सर्वसाधारण सभा आज (गुरुवारी) आयोजित केली आहे. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. सभेच्या सुरवातीला शिवसेनेच्या नगरसेविका मीनल यादव यांनी भाजपचे आमदार राम कदम यांचा निषेध करण्याची मागणी केली. परंतु, महापौरांनी त्यांना बोलण्यापासून रोखले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका  वैशाली घोडेकर यांनी राम कदम यांच्या निषेधाचा ठराव मांडला. त्याला वैशाली काळभोर यांनी अनुमोदन दिले.

तरीही महापौर राहुल जाधव यांनी निषेध करण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. आमदार कदम यांचा निषेध करण्याची मागणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.