Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ( Pimpri)  राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका पौर्णिमा रविंद्र सोनवणे (वय 44) यांचे आज (सोमवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा असा परिवार आहे.

Maharashtra : यंदा थंडी कमीच…जानेवारी व फेब्रुवारीमध्ये थंडीच्या लाटेची शक्यता नाही, हवामान खात्याचा अंदाज

तळवडे, रुपीनगर भागातून 2012 आणि 2017 मध्ये दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून पौर्णिमा सोनवणे या महापालिकेवर निवडून आल्या होत्या. स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.  मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पौर्णिमा सोनवणे यांच्या पार्थिवावर दुपारी एक वाजता निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात येणार ( Pimpri)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.