_MPC_DIR_MPU_III

Mumbai : T20 विश्वचषक पुढे ढकलण्याची दाट शक्यता; मात्र IPLचे आयोजन होऊ शकते – अनिल कुंबळे

Dense chances of postponing T20 World Cup; But IPL can be organized - Anil Kumble

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा रद्द होण्याची शक्यता असली, तरी IPLचे आयोजन नक्कीच करता येऊ शकते, असा आशावाद भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेने व्यक्त केला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

अनिल कुंबळे म्हणाले, यंदाच्या वर्षांत ‘IPL’चे आयोजन होण्याबाबत मी आशावादी आहे. T20 विश्वचषक पुढे ढकलण्यात येण्याची दाट शक्यता आहे. तसे न झाल्यास विश्वचषकापूर्वीच्या काळातील मालिकांऐवजी IPL खेळवावी.

_MPC_DIR_MPU_II

IPL झाल्यास प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणे अशक्य आहे. मात्र, घरबसल्या चाहते नक्कीच सामने बघतील आणि त्याद्वारे आर्थिक नुकसानाची भरपाई करता येणे शक्य असल्याचे कुंबळेने सांगितले.

दरम्यान, क्रिकेटपटू रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली यांच्यासह इतर खेळाडूंनी सुद्धा वेळोवेळी IPL आयोजनाबाबत शक्यता बोलून दाखवली आहे. अतुल वासन यांनी काही दिवसांपूर्वी यावर्षीचे IPLचे सामने दुबईमध्ये खेळवले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली होती. तसेच अनेक खेळाडूंचा याला पाठिंबा असल्याचे देखील सांगितले होते.

कोरोना संकटामुळे सर्व खेळांवर संकट आले असून पूर्वनियोजित सर्व सामने अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना आगामी क्रिकेट सामन्यांबाबत काय निर्णय होणार, याकडे सर्व क्रिडा रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.