Nigdi:  शिवसेना शाखा यमुनाननगर आयोजित  शिबिरात 63 जणांचे रक्तदान

Blood donation of 63 people in the camp organized by Shiv Sena branch Yamunannagar

एमपीसी न्यूज –  शिवसेना यमुनानगर विभागाच्या वतीने स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 63 रक्तदात्यांनी रक्तदान केले.  प्रत्येक रक्तदात्यांना एन 95 मास्क व गोदरेज, लाईफ बॉय कंपनीचे सॅनेटायझर भेट देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिका वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने डॉ. लोंढे, कौंसिलर आम्रपाली गायकवाड त्यांच्या टीमने या शिबिरासाठी योगदान दिले.

यावेळी सुमारे 104 रक्तदात्यांनी पुन्हा  शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवशी 19 जूनला आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यासाठी नावनोंदणी केली.

रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसेना जिल्हा संघटिका  सुलभा उबाळे, भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी शहरप्रमुख रामभाऊ उबाळे यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख सतीश मरळ देशमुख, उपविभाग प्रमुख गणेश इंगवले, अंकुश जगदाळेसंजय शेट बोऱ्हाडे , युवा नेते अजिंक्य उबाळे, शाखाप्रमुख महेश डोके, चवडडप्पा तलवार,  कौस्थुभ गोळे आदींनी केले.

पावन मारुती मंडळाचे अध्यक्ष जयंतराव बरशेट्टी, जेष्ठ नागरिक संघांचे शहर उपाध्यक्ष गजानन ढमाले,  सुभाष सराफ, नितीन बोन्डे,  मच्छिन्द्र महाकाळ, भरत डोके, अरुण बांद्रे, मिलिंद कोंढाळकर, प्रदीप बेळगावकर, किशोर शिंदे, सागर गोलांडे, आण्णा रसाळ, ओम परदेशीं, गणेश गाडे, संतोष गायकवाड, संजय गाडवे, पांडुरंग पोवार, नारायण कोरवी, अनिकेत येरुणकर, सार्थक दोषी, गणेश सस्ते,  वैभव सस्ते,  लोकेश मुचुनडीकर, अविनाश हरिहर,  विवेक गवळी,  सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार,  सूरज दण्डर,  मुलचंद मणेरे यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.