Alandi : विकसित भारत संकल्प यात्रा आळंदीत संपन्न; 500 पेक्षा जास्त नागरिकांनी नोंदविला सहभाग

एमपीसी न्यूज : केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे फायदे (Alandi) लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यादृष्टीने देशभर सुरू असलेली विकसित भारत संकल्प यात्रा शनिवारी (दि.6 रोजी) आळंदी नगरपरिषद कार्यक्षेत्रात दाखल झाली होती व यावेळी बचत गटाच्या महिला,पथ विक्रेते यांच्यासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून विविध शासकीय योजनांची माहिती घेवून नोंदणी केल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाद्वारे या संकल्प रथाची रचना करण्यात आली आहे. तळागाळातील लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा व सर्वांना त्यांची माहिती व्हावी,हा विकसित भारत संकल्प यात्रेचा मूळ हेतू आहे. दिनांक 31 डिसेंबर ते 14 जानेवारी या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा मध्ये हा विकसित भारत संकल्प यात्रा रथ फिरणार असून याचाच एक भाग म्हणून हा रथ आज शनिवारी आळंदीत दाखल झाला होता.

Chinchwad : ‘ नांदी’ स्मरणिकेतून 100 वर्षातील नाट्य संमेलन अध्यक्षांच्या कारकीर्दीला मिळाला उजाळा

आळंदीत या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे स्वागत आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आळंदी नगरपरिषद च्या चारही शाळांचे मुख्याध्यापक संतोष मरभळ,विजया घनवट,शोभा पवार,एकनाथ साकोरे तसेच सर्व शिक्षक वृंद,बचत गटाच्या महिला,पथ विक्रेते,नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होवून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत त्यांनी माहिती घेतली. विकसित भारत संकल्प यात्रेचे विशेष आकर्षण हा संकल्प रथ असून विविध योजनांची माहिती देणारी छायाचित्रे व जनजागृतीपर बॅनर, पोस्टर्स या रथावर लावण्यात आलेली आहेत.

आळंदी शहरामध्ये विकसित भारत संकल्प यात्रा रथ दुपारी 3:30 ते 5: 30 या वेळेत नगर परिषद शाळा क्रमांक 3 येथे दाखल झाला होता. यावेळी उपस्थितांना आपला संकल्प विकसित भारत शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अंकुश बहिरट यांनी केले.

प्रधानमंत्री स्वनिधी, प्रधानमंत्री स्वनिधी से समृद्धी,प्रधानमंत्री विश्वकर्मा (Alandi) कौशल्य सन्मान योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना (नागरी),आयुष्यमान भारत योजना,स्वच्छ भारत अभियान (नागरी) इत्यादी योजनांची माहिती यावेळी नागरिक व लाभार्थी यांना देण्यात आली तसेच सर्वांची आरोग्य तपासणी करून बीपी,शुगर यांची चाचणी घेण्यात आली.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक विष्णुकुमार शिवशरण,विशाल बासरे,वैशाली पाटील,अर्जुन घोडे यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.