Pune : विविध प्रमुख मागण्यांसाठी महापालिका आयुक्तांशी सकारात्मक चर्चा – दीपक मानकर

एमपीसी न्यूज – आपलं पुणे विकासाचा नवा आलेख (Pune) चढत असून सध्या सुरू असलेल्या विकासकामांना गती मिळावी म्हणून आवश्यक निधीची तरतूद करणे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली.

पुणे शहरातील विविध समस्या संदर्भात निवेदन दिले. तसेच अन्य मागण्या त्यांच्या समोर सविस्तर मांडल्या. शिक्षक भरतीसाठी अनेक आंदोलने सुरू असतात. डीएड इंग्रजी माध्यम शिक्षक करणे तसेच मनपा ठेकेदार पद्धती रखवालदार यांना कायम करणे, या मागण्यांवर आयुक्तांशी सकारात्मक चर्चा केली.

Alandi : विकसित भारत संकल्प यात्रा आळंदीत संपन्न; 500 पेक्षा जास्त नागरिकांनी नोंदविला सहभाग

लवकरात लवकर या मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंती देखील केली. यावेळी (Pune) महिला अध्यक्षा प्रिया गदादे, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, युवती अध्यक्षा पुजा झोळे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम मातोळे, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष अभिषेक बोके, दत्ता सागरे, अ‍ॅड. भैय्यासाहेब पाटील, ॲड. पुष्कर दुर्गे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.