Nigdi News: भक्तांचा सखा भगवंत – ह.भ.प. डॉ. अवंतिका टोळे

एमपीसी न्यूज – ज्याचे कोणाशी वैर नाही अशा भक्तांचा सखा भगवंत होतो, असे विचार ह.भ.प. डॉ. अवंतिका टोळे यांनी पाच दिवसीय नारदीय परंपरेतील कीर्तन महोत्सवात व्यक्त केले.

हा महोत्सव श्रीराम मंदिर, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे शनिवार (दि.10) पार पडला. पाच दिवसीय नारदीय परंपरेतील कीर्तन महोत्सवात तृतीय पुष्पाचे निरूपण ह.भ.प. डॉ. अवंतिका टोळे यांनी केले. माजी नगरसेविका शर्मिला बाबर, राजेंद्र बाबर, मुकुंद इनामदार आदी उपस्थित होते.

“ज्याचा सखा हरी |त्यावरी विश्व कृपा करी |उणें पडों नेदी त्याचें |वारे सोसी आघाताचें |

ऐसा अंकित भक्तांसी |म्हणे नामयाची दासी ||”या संत जनाबाई यांच्या अभंगाचे निरूपण करताना डॉ. अवंतिका टोळे यांनी सखा, मित्र, सुहृद या शब्दांमधील सूक्ष्म भेद सोदाहरण स्पष्ट केला. कीर्तनाच्या उत्तररंगात त्यांनी भागवता मधील दशम स्कंध यातील सुदामा – श्रीकृष्ण आख्यान कथन केले.

Dehuroad : सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

तसेच संस्कृत, मराठी, हिंदी भक्तिरचनांचे गायन करीत डॉ. अवंतिका टोळे यांनी नवकोट नारायण श्रीकृष्ण आणि कफल्लक सुदामा यांच्या भेटीचे हृद्य वर्णन करताना श्रोत्यांच्या अंत:करणाला हात घातला. त्यामुळे सद्गदित झालेल्या सर्व श्रोतृवृंदाने उभे राहून कीर्तनसेवेला मानवंदना दिली. कानिफनाथ घैसास यांनी तबला आणि धनवर्षा प्रभुणे यांनी संवादिनीवर सुरेल साथसंगत केली.

श्रीराम विश्वस्त मंडळाने संयोजनात सहकार्य केले. यावेळी संजय दातार यांनी सूत्रसंचालन केले. सामुदायिक आरतीने तृतीय पुष्पाचा समारोप करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.