Digestion and the Five Principles : अन्नपचन आणि पाच  तत्त्वे. 

एमपीसी न्यूज (डॉ. रेणुका देसाई) – अन्न हे आपल्या शरीरासाठी किती (Digestion and the Five Principles)महत्वाचे आहे हे तर आपण सर्वच जण जाणतो. तरीही हेअन्नच  काही आजारपणांना कारणीभूत होते. हे कोडे सोडवण्यासाठी आपली पाचन प्रक्रिया समजूया. आपले शरीर हे पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि अग्नि अश्या 5 तत्त्वांनी बनले आहे, ज्यांना ‘पंचमहाभूत’ असे म्हंटले जाते. 
आपल्या पाचन प्रक्रियेमध्ये, अन्नावर प्रक्रिया करून पोषक घटक वेगळे केले जातात आणि उरलेला चोथा मलाच्या रूपात बाहेर काढला जातो. सोप्प्या उदाहरणाने समजायचे असेल तर आपल्या शरीरात हे पाच हि तत्व मुळातच असतात. आता जर आपण असे पदार्थ खाल्ले, जे कि फार शुष्क किंवा सुके असतील तर पाचन करण्याकरता लागणारे जल हे शरीर शरीरातील इतर इंद्रियांपासून  घेते.
त्यामुळे जेव्हा आपण ब्रेड सारखे सुके पदार्थ खातो, तेव्हा आपल्या शरीरातील जल तत्व कमी होते आणि आपले शरीर पाण्याची अपेक्षा करते आणि जर आपण ते नाही दिले तर असे अन्न आपल्या आतड्याला चिकटून राहते. त्यामुळे निरोगी  शरीरासाठी, आपले अन्न  निवडताना आपण या घटकांचा विचार करायला हवा.

Bagad Yatra : पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी मोडले बगाड, हिंजवडीत रिंगण रद्द तर पारुंडे येथे दोघे जखमी 

 

म्हणजे जेव्हा शरीराला जल तत्वाची गरज असेल तेव्हा, आपण फळ, ज्यूस  असे जलयुक्त पदार्थांचं सेवन करायला हवे, जेणे करून आपले शरीर हैड्रेटेड राहील. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या शरीरात जल तत्त्व अधिक असेल (Digestion and the Five Principles) आपण अश्या पदार्थांचं सेवन केले पाहिजे ज्याच्याने ती मात्रा कमी होईल.
शरीराला पचन करण्यासाठी, वायूची गरज असते. वायूच्या साहाय्याने, पोषणतत्त्वे रक्तवाहिन्यांत पाठवण्यात येते आणि असे रक्त पूर्ण शरीराकडे पाठवण्यात येते आणि उरलेला चोथा हा उत्सर्जन भागाकडे पाठवण्यात येतो. पांचन  प्रक्रिये मध्ये शरीर ‘पाचक रस’ तयार करते, जे अन्न पचण्यासाठी मदत करते. शरीरात अन्नाचे विघटन होते आणि नुट्रीएंट्स आणि मिनरल्स वेगळी केली जातात जे कि पृथ्वी तत्व आहेत. वायु  तत्व हे या प्रक्रियेत फार महत्वाचं काम करते.
आपण जेव्हा गरजे पेक्षा जास्त खातो, तेव्हा अन्न प्रक्रिया करायला जागा उरत नाही, म्हणजे आकाश तत्वाची कमी होते. त्यामुळे आपले अन्न व्ययस्थित प्रकारे प्रोसेस  किंवा अब्जोरबड  होत नाही. ढेकर हे आपल्या शरीराचे सिग्नल आहे कि खाणे बंद करावे, त्या पलीकडे, अन्न प्रोसेस करायला जागा नाही. आणि तेव्हा पुढचे त्रास वाचवण्यासाठी तात्काळ थांबावे. नाही तर शरीरातील तत्वांचा समतोल  बिघडत.

अन्न चावताना त्याला व्यवस्थित चावून पातळ करणे गरजेचे असते. शरीरातील लाल हे नैसर्गिक रित्या जल तत्त्व मिसळते. नैसर्गिक रित्या आपल्या शरीरात एक मेकॅनिसम  आहे ज्याने आपली पाच प्रक्रिया व्यवस्थित चालते.
आपले जेवण हळू हळू जेवावे, आणि फिसिकल ऍक्टिव्हिटी कडे हि लक्ष देणे गरजेचे आहे. जेवणा नंतर  लगेचच एका खुर्चीत बसून कामाला  लागणे टाळावे. कारण जेवल्या नंतर आपले वरचे शरीर सक्रिय असते, मात्र शरीराचा खालचा भाग मात्र निष्क्रिय असतो. त्यामुळे जेवण नंतर थोडे चालणे जेवण पचण्यास खूप फायदेशीर असतो. अन्यथा नुसते बसून राहिल्यामुळे, रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही आणि, नाभी पासून खालील भागावर मेद जमा होऊन ओबेसिटी सारखे तोटे होऊ शकतात.
जेव्हा आपल्या आहारात तेलकट पदार्थ जास्त घेतले जातात, तेव्हा शरीराला पोषणतत्त्वे वेगळे करण्यास कठीण होते. मेदा ला जाळण्यासाठी, शरीरातील अग्नी तत्व मदत करते. त्यामुळे व्यायाम मार्फत अग्नी तयार करून आपण मेदाचा संचय थामू
एकंदरीतच योग्यवेळी योग्य खाणे आणि व्यवस्थित व्यायाम करणे, हे चांगल्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. एकंदरीत आपला आहार या  तत्वांना व्यवस्थित समजून घेतल्यास आपल्या शरीराला निरोगी राहण्यास मदत करू शकतो.
लेखिका: डॉ. रेणुका देसाई
डॉ. रेणुका देसाई या अत्यंत अनुभवी आणि समर्पित निसर्गोपचार आहेत ज्यांना या क्षेत्रातील 2 दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांना निसर्गातील उपचार शक्तींचा शोध घेण्याची तीव्र उत्कट इच्छा आहे आणि ती तिच्या रूग्णांच्या जीवनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपचार उपायांचे मिश्रण वापरते. वेदिक विज्ञानातील त्यांची रुची तिला मन, शरीर आणि आत्मा विचारात घेणाऱ्या उपचारासाठी एक अद्वितीय दृष्टीकोन विकसित करण्यास प्रवृत्त करतात.
डॉ. देसाई हे रेकी मास्टर आहेत आणि त्यांना एनर्जी हिलिंगचे विस्तृत ज्ञान आणि कौशल्य आहे. त्यांच्याकडे GUA SHA थेरपी, आयुर्वेदिक साउंड हीलिंग, इलेक्ट्रो होमिओपॅथी आणि लीफ थेरपीमध्येही प्राविण्य आहे. याव्यतिरिक्त, ती विशेष अपंग मुलांसाठी वारंवारता उपचार प्रदान करते. तिची कौशल्ये आणि ज्ञानाची विस्तृत श्रेणी तिला यांच्या रुग्णांना सर्वांगीण आणि वैयक्तिकृत काळजी प्रदान करण्यास अनुमती देतात.
डॉ. देसाई यांना त्यांच्या क्षेत्रात अत्यंत आदराने ओळखले जाते आणि त्यांनी उच्चभ्रू वर्गामध्ये लक्षणीय अनुयायी असलेले विश्वासू आणि शोधलेले आरोग्य व्यावसायिक म्हणून प्रतिष्ठा निर्माण केली आहे. तिचे क्लायंट तिच्या सर्वांगीण दृष्टीकोन, वैयक्तिक काळजी आणि त्यांना इष्टतम आरोग्य आणि निरोगीपणा प्राप्त करण्यात मदत करण्याच्या समर्पणाची प्रशंसा करतात. 2022 सालासाठी (Digestion and the Five Principles) भारतातील टॉप 20 हेल्थ केअर एक्स्पर्ट्सपैकी एक म्हणून यांची ओळख ही यांच्या रूग्णांना शक्य तितकी सर्वोत्कृष्ट काळजी देण्याच्या यांच्या उत्कटतेचा आणि वचनबद्धतेचा पुरावा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.